Top News

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज

चंद्रपूर:- 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे.

बुधवारी (दि.27 मार्च) अर्ज दाखल करणा-यांमध्ये धानोरकर प्रतिभा सुरेश (काँग्रेस) यांनी 3 अर्ज, बेले राजेश वारलुजी (वंचित बहुजन आघाडी) यांनी 3 अर्ज, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी 1 अर्ज भीमसेना पक्षाच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दूल कुरेशी यांनी 1 अर्ज अपनी प्रजा हित पार्टीच्या वतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, रमेश आनंदराव मडावी यांनी 1 अर्ज बहुजन समाज पार्टीच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

याशिवाय पुर्णिमा दिलीप घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरोंके वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर कोंदुजी बडोले (अपक्ष), मिलिंद प्रल्हाद दहिवले (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रेटीक), अमोल ओमप्रकाश कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र कृष्णराव हजारे (अपक्ष), दिनेश रामबिशाल मिश्रा (अपक्ष), वनिता राजेंद्र राऊत (अखील भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), वाघमारे संदीप विठ्ठल (अपक्ष), देठे प्रमोद देवराव (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), संजय हरी टेकाम (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), शेख ताजुद्दीन वजीर (अपक्ष), सुर्या मोतीराम अडबाले (अपक्ष), अनिल आनंदराव डहाके (अपक्ष), दिवाकर हरीजी उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप पुंडलीकराव माकोडे (अपक्ष), गीता अरुण मेहर (अखील भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने