Top News

विरूर (स्टे.)येथे वैराग्यमूर्ती, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची १४८ वी जयंती साजरी.

विरूर (स्टे.)येथे वैराग्यमूर्ती, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची 148 वी जयंती साजरी.


विरुर स्टे.:- श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज मंडळ विरूर( स्टे.)च्या वतीने निष्काम, कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबा, यांच्या148 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन , श्री.संत गाडगेबाबा समाज मैदान विरूर स्टे ता.राजुरा येथे पार पडला.
सर्व प्रथम गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. व उपस्थित पाहुणे मंडळीचे स्वागत करण्याकरिता स्वागत गीत कु. श्रद्धा गणेश तुराणकर यांच्या संचाने म्हटले व पुष्पगुछ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ मुक्के जिल्हाध्यक्ष, अविनाश जाधव माजी जि.प. सदस्य पंढरीनाथ क्षिरसागर, उद्धव नांदे,मिलिंद लोणारवार व अमोल लोणारवार, देवाजी बारसागडे, प्रमुख वक्ते श्री. जहीर खान सर, शिक्षक तथा उपासक गुरुदेव सेवा मंडळ राजुरा यांनी गाडगेबाबाचे जीवनचरित्र सांगितले, अनिल आलाम, सरपंच ग्रा. पं विरूर (स्टे.),अजय रेड्डी, अनिल चिडे, रविता केळझडकर -महिला सचिव राजुरा , मीराताई ताजने- कार्याध्यक्षा राजुरा , नंदकिशोर कोंडावार, रमेश लोणारे, संजय रेगुंटावार व इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात समाजातील समस्या आरक्षण बाबत ,आणि इतर तत्सम समस्यावर जिल्हाध्यक्षानी प्रकाश टाकला.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक राजकुमार चिंचोलकर तालुका अध्यक्ष धोबी समाज राजुरा,संचालन प्रेम श्रीकोंडावर तर आभार प्रदर्शन संस्कार निमलवार यांनी केले. कार्यक्रमात, राष्ट्रीय धोबी समाज महासंघाद्वारे यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त विधवानाथजी मुक्के व नामदेवराव लोणारवार सर यांना मोमेन्टो व ढाल श्रीफळ देऊन विरूर स्टे. तर्फे सत्कार करण्यात आला.,    देण्यात आले होते शेवटी सर्वांनी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता ज्ञानेश्वर तुराणकर-अध्यक्ष,सत्यपाल मेडिपेल्ली-सचिव , गणेश तुराणकर, संदीप तुराणकर, मारोती निमलवार, नारायण श्रीकोंडावार, रमेश भोस्कर,सुरज भोस्कर, स्वप्नील निमलवार, शुभम भोस्कर, प्रेम श्रीकोंडावार,संतोष श्रीकोंडावार, संगीता भोस्कर, अनिता निमलवार,अनिता चिंचोलकर, वैशाली तुराणकर, प्रतिभा तुराणकर, रेखा तुराणकर, शारदा निमलवार, मनीषा मेडिपल्ली,नंदिनी तुराणकर, मंगला मेडिपल्ली,वेणूबाई तुराणकर यांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.
    

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने