चंद्रपूर लोकसभेची मतमोजणी "तारीख" व "ठिकाण" वाचा सविस्तर

Bhairav Diwase

चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 314 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यातील 4 तर यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा क्षेत्रात समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक पथक जिल्ह्यात तैनात आहे. तर आणखी तीन पथके मतदान प्रक्रियेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी येणार आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक खर्च तपासण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

चंद्रपूरच्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळ येथे मतदान झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवली जाणार असून याच ठिकाणी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.