Top News

सुधीर मुनगंटीवार लढणार चंद्रपूर लोकसभा #chandrapur #chandrapurloksabha


कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण; #अबकीबारभाऊखासदार ट्रेंड सुरू



चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. आता भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव करीत #अबकीबारभाऊखासदार #AbakiBarBhauKhasdar ट्रेंड सुरू झालेला आहे.


Also Read:- वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 




कोण आहेत सुधीर मुनगंटीवार?


सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्यातील आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीन खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी 2014-19 च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ आणि नियोजन व वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी, ते २०१० ते २०१३ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे (महाराष्ट्र) प्रदेशाध्यक्ष होते, आणि पर्यटन मंत्री आणि १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्र सरकारमधील ग्राहक संरक्षण होते. सण २०१४ मध्ये ते सलग पाचव्या टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांचा अतिरिक्त कार्यभारही आहे. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे.


Also Read:- सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महाराष्ट्रातील 'या' नेत्याचं नाव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने