पतीकडून पत्नीची गाढ झोपेतच गळा आवळून हत्या #chandrapur #jiwati #murder


चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

जिवती:- पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीची दोरीने गळा आवळून निघृण हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील करणकोंडी येथे शनिवारी दि.९ मार्चला सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सगुणा अनिल चव्हाण (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पती अनिल चव्हाण हा रात्रीच फरार झाला होता. त्याला करणकोंडी जंगलातून २४ तासातच अटक करण्यात आल


Also Read:- देवदर्शनासाठी गेलेल्या भक्ताचा नदीपात्रात बुडून मृत्यू


करणकोंडी येथील आरोपी अनिल चव्हाण यांचे कुटुंब शेतीवरच उदरनिर्वाह करते. त्याला पाच वर्षांची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पती अनिल पत्नी सगुणा, दोन्ही मुले आणि वृद्ध सासू व सासरे एकत्र मिळून जेवण केले. जेवणानंतर सासू मृतक सगुणा सासरे बाहेर, तर चव्हाण पती-पत्नी व मुले घरात झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री पती अनिलने पत्नी सगुणाचा झोपेतच गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर रात्री तो फरार झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर घारपाणा येथील फिर्यादी राजकुमार राठोड यांनी पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची तक्रार जिवती पोलिसांत दाखल केली.


Also Read:- महाशिवरात्रीच्या सुटीत आखला प्लॅन


पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. हत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. फरार आरोपी पती अनिल याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. शनिवारी आरोपीला करणकोंडी जंगलातून अटक करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने