Top News

मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल भूमिपूजन #chandrapur #Korpana

सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते भूमिपूजन

चंद्रपूर:- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा येथे मोदी आवास योजनेअंतर्गत श्री.दिवाकर पाटील मोडक यांच्या घरकुलचे भूमिपूजन मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई वसंतराव ताजने यांच्या हस्ते संपन्न झाले.
ओबीसी प्रवर्गासाठी आत्तापर्यंत घरकुल योजना नव्हती त्यामुळे अनेक ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी घरकुलापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहत होते,त्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हते.याची दखल घेऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्याच्या इतिहासात प्रथमच ओबीसी प्रवर्गासाठी घरकुल योजना मोदी आवास योजनेअंतर्गत सुरू केली,त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास १२ हजाराच्या वरती घरकुल मंजूर झालेले आहे,त्याच अनुषंगाने कोरपना तालुक्यात ४३७ व नारंडा गावात २२ घरकुल ओबीसी प्रवर्गासाठी मंजूर झालेले आहेत सदर घरकुल मंजूर झाल्यामुळे अनेक ओबीसी प्रवर्गातील गरीब लाभार्थ्यांचे या ठिकाणी घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.

यावेळी नारंडा येथे दिवाकर पाटील मोडक यांच्या घरकुलाचे भूमिपूजन ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई वसंतराव ताजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,रूपालीताई उरकुडे, शालुताई हेपट,नागोबा पाटील,कवडू पाटील उरकुडे, प्रवीण हेपट,प्रमोद शेंडे,गजानन चतुरकर,दिवाकर मोडक,शालिकराव मोडक,गजानन तिखट,शुभम चाहारे,राजू परसुटकर, राजू तिखट,चंद्रभान तिखट,शुभम निमकर,विठ्ठल निमकर,राकेश मोडक,रवींद्र मोडक,जगन गुरनुले,तुळशीराम चाहारे,भिकाजी घुगुल,हर्षल चामाटे,यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने