Top News

विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारी संस्था 'उड़ान अकॅडमी' #chandrapur #udaanacademy



 कष्टाला कल्पनेची जोड देत जिद्दीने आणि धाडसाने पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे काम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून उड़ान द करिअर अकॅडमी संस्थेचे संचालक इंजि. जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे करत आहेत. आतापर्यंत अनेक विद्यार्थी पोलिस, आर्मी व इतर राज्य सेवेत यशस्वी झाले आहेत. फक्त मार्गदर्शन नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम उड़ान अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे.

उड़ान ॲकडमीचे संस्थापक व आधारस्तंभ इंजि. जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे हे पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. इंजि. पिंपळशेंडे यांनी स्वतःच्या अडचणींना आणि समस्यांना तोंड देत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून त्यांना कळले की, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अनेक अडचणी येतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्यासाठी त्यांनी उड़ान ॲकडमीची स्थापना केली.

1 ऑगस्ट 2018 रोजी चंद्रपूर येथे तुकूम परिसरात एका छोट्याशा जागेत उड़ान द करिअर अकॅडमी नावाने स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरू केले. उडान अकॅडमीने सुरुवातीला एका छोट्याशा खोलीत प्रशिक्षण सुरू केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना मोठी रुम घेणे भाग पडले. 10 जुलै 2023 रोजी मातोश्री शाळा चौक, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे उड़ान ॲकडमीच्या नवीन रुमचे उद्घाटन झाले.

अकॅडमीमध्ये चालणाऱ्या बॅचेस

■ महाराष्ट्र पोलिस भरती, रेल्वे पोलिस भरती, वनरक्षक भरती

■ तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा, लिपिक संवर्ग, कृषी विभाग, जिल्हा परिषद

■ एसआरपीएफ, रेल्वे भरती, स्टाफ सिलेक्शन, भारतीय सैन्य भरती


अकॅडमीची वैशिष्ट्ये

■ अनुभवी प्राध्यापक

■ अनुभवी मैदानी प्रशिक्षक

■ सर्व परीक्षाचे सराव पेपर

■ 24 तास अभ्यासिका

■ सहलीचे नियोजन

■ राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये नव्याने निघालेल्या जागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते

उडान अकॅडमीच्या यशाबद्दल बोलताना इंजि. पिंपळशेंडे म्हणाले, "आमचा उद्देश खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी मदत करणे हा आहे. आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उड़ान ॲकडमीच्या यशामुळे खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. उड़ान ॲकडमीमुळे प्रशासकीय सेवेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
लेख:- भैरव धनराज दिवसे


संपर्क:-
Er. Jitendra Pimpalshende sir
UDAAN THE CAREER ACADEMY CHANDRAPUR
Tukum Road Near Matoshree School Chandrapur
8806475060
9529995698

OFFICIAL ACCOUNT.....





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने