Top News

उठ तरुणा जागा हो, विकसित भारताच्या मार्गातला तुही एक धागा हो! #Chandrapur


नवभारताची शक्ती हीच युवाशक्ती:- विशाल निंबाळकर
चंद्रपूर:- भारताला विश्वगुरूपदी आसनस्थ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी , या देशाच्या पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी तरुणा आज तुझ्या सहभागाची गरज आहे.

आणि म्हणूनच नागपूर येथे होणाऱ्या नमो युवा महासंमेलनामध्ये तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हायच आहे . नागपूर मध्ये सोमवार दि. ४ मार्च ला होऊ घातलेल्या या नमो युवा महासंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या सर्व मित्र-मैत्रिणीसह या . याच युवाशक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित नमो युवा महासंमेलन चा माध्यमातून भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी हजारो युवकां शी संवाद साधणार. आपण सर्व युवकांनी स्थळ जमनालाल बजाज प्रशासनिक भवन, कॅम्पस चौक, अंबाझरी टी पॉइंट रोड, नागपूर येथे चला तरुणांनो, देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यात आपणही सहभागी होऊया‌. परत एकदा आदरणीय नरेंद्रजी मोदीजींना पंतप्रधान बनण्यासाठी निष्ठा पूर्व योगदान देऊया ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चला नागपूरला जाऊया. असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (महानगर) विशाल निंबाळकर आणि भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) महेश देवकते यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने