Top News

'दिल्ली से दूर' राहू इच्छिणाऱ्या मुनगंटीवारांवरच पक्षाचा विश्वास #Chandrapurloksabha #chandrapur

चंद्रपूर:- भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


Also Read:- सुधीर मुनगंटीवार लढणार चंद्रपूर लोकसभा

आश्चर्याची बाब म्हणजे मुनगंटीवार यांची दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले. माझे लोकसभेचे तिकीट कापले जावे, यासाठीच मी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी वक्तव्यदेखील केले होते. अशास्थितीत त्यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले की काय? अशीच पक्ष वर्तुळात चर्चा होती.


Also Read:- ना. मुनगंटीवारांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष


मुनगंटीवार दिल्लीत जाण्यासाठी इच्छुक का नाहीत हे पक्षाच्या निरीक्षकांनी जाणूनदेखील घेतले होते. मात्र, जागांचे गणित बसवताना पक्ष नेतृत्वाने मुनगंटीवार यांच्यावरच विश्वास टाकला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा नसतानादेखील त्यांना वर्धा येथून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र यादीत त्यांचे नाव नसल्याने जे बावनकुळे यांना जमले ते मुनगंटीवारांना जमले नसल्याची चर्चा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने