Rajesh bele: चंद्रपूर लोकसभेचे राजेश बेले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase


चंद्रपूर:- वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एकूण 8 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.

 

वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस ने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर वंचित बहूजन आघाडीने चंद्रपूर लोकसभेसाठी राजेश बेले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजेश बेले हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.


Aslo Read:- Naxal Encounter: सुरक्षा दल व नक्षलवाद्यांच्या चकमकीत ६ माओवादी ठार