Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर #chandrapur #shivsenaUBT #Mumbai

Bhairav Diwase

मुंबई:- लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. तसेच, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक्सवर (ट्विटर) यादी जाहीर केली आहे. काल संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आज किंवा उद्या शिवसेनेची यादी जाहीर होईल अशी माहिती दिली होती. त्यानंतर आज शिवसेनेची यादी जाहीर झालेली आहे.

विद्यामान खासदारांना पुन्हा संधी

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत विद्यमान खासदारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे. यामध्ये धारशीव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत, ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी

बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे - पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
सांगली - चंद्रहार पाटील
संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धारशीव - ओमराजे निंबाळकर


शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक - राजाभाऊ वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
मुंबई - ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई - दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई - वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव