हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर आप कार्यालयात राजुरा तर्फे बुंदी व शरबत चे वाटप.

हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर आप कार्यालयात राजुरा तर्फे बुंदी व शरबत चे वाटप.


राजुरा : आम आदमी पार्टी, जि. चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यावतीने  आम आदमी पार्टी राजुरा तर्फे
संकट मोचक ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत मंगळवार दि. २३/एप्रिल/२०२४ रोजी शहरात पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालय समोर बुंदी व शरबत चे वाटप करण्याचे आयोजिले आहे. 
 
 राजुरा विधानसभा क्षेत्रामधील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, तथा जनसामान्यांच्या गंभीर समस्यांचे निवारण करण्याकरिता श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या जनतेप्रती ची भूमिका ही नेहमीच संकट मोचक सारखीच असल्याने राजुरातील स्थानिक आजी-माजींकळे ज्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत अशा निराश झालेल्या नागरिकांच्या समस्या श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी वेळोवेळी मार्गी लावल्या असल्याने त्यांच्या याच कामाच्या आधारावर राजुरा येथील जनतेचं स्वप्न हे श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून बघण्याचे झाले असल्याने जनतेच्या आग्रहास्तव निश्चितच निवडणुकीच्या रणांगणात श्री. सुरजभाऊ ठाकरे उतरतील हे निश्चित. या पर्वाची सुरुवात ही हनुमान जयंती च्या पावन पर्वा वर बुंदी व शरबत चे वाटप करून  करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या