Top News

जि.प. शाळा, खामोना येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.


राजुरा:- शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , खामोना या ठिकाणी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1 कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय किशोर पोटे , इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांचे स्वागत व शाळा पूर्वतयारीची गरज काय ? यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आठ आठवडे चालणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमात कृतीपत्रिका व गुणवत्तेकडे पहिले पाऊल या पुस्तिकेतून विद्यार्थ्यांना पालक व माता पालकांनी मार्गदर्शन कसे करावे ? याबद्दल विस्तृत माहिती शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय लांडे सर यांनी केले.

सर्व नवीन भरती पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत प्रत्येक स्टॉलवर उपस्थित असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीद्वारे कृती करून घेण्यात आल्या व भाषा विकास, गणनपूर्व तयारी, सामाजिक व भावनिक विकास ,बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता याबद्दल कृती घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शाळा व शिक्षण याविषयी आवड निर्माण करण्याचे कार्य याप्रसंगी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून करण्यात आले. सर्व नवीन भरतीपात्र विद्यार्थी, पालक ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक तथा शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थी या सर्वांना नास्ताचा आस्वाद गोड वस्तू सोबत देण्यात आला. सर्वांनी खूप आनंदाने व मौजेने हा दिवस स्मरणीय बनवण्यासाठी कृती व कार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने