घटस्फोटीत महिलेवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- चेक पोंभूर्णा येथील पिडीता आपल्या घरात एकटीच असतांना आरोपी पिण्याचे पाणी मागण्यांच्या बहान्याने घरात घुसून बलात्कार केल्याची घटना दि.२८ मार्च गुरुवारला दहा वाजताच्या सुमारास घडली.याबाबत पिडीतेने दि.३१ मार्च रविवारला रात्रो दहा वाजता पोलिसात तक्रार दाखल केली असून.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशाल नकुल वनकर वय (३२) वर्ष रा.पोंभूर्णा असे आरोपीचे नाव आहे.

चेक पोंभूर्णा येथील 25 वर्षीय पिडीता हि घटस्फोटीत आहे.व आपल्या मुलांसोबत आईच्या घरी राहते.गुरूवारला रात्रो दहा वाजताच्या दरम्यान आरोपी विशाल हा पीडितेच्या घरी एकटी असल्याचे पाहून पिण्याचे पाणी मागण्याच्या बहान्याने घरात घुसून तिच्यासोबत अतिप्रसंग केला.याबाबत पिडीताने रविवारला पोंभूर्णा पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी भादवी ३७६,४५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून.आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार करीत आहे.