चंद्रपूरात "ओपिनियन पोल"चा झोल! #Chandrapur

चंद्रपूर:- नुकतीच १९ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक पार पडताक्षणीच समाज माध्यमांवर विविध ओपिनियन पोल मांडण्यात येत होते. नुकतेच "एबीपी माझा" या प्रादेशिक चॅनेलने त्यांच्या नावाने दाखविण्यात येणारा ओपिनियन पोलशी त्यांचा कोणताही संबंध नसून त्या विरोधात कायदेशीर कारवाई असल्याचे माहिती प्रकाशित केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर व भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशी दुहेरी लढत आहे. सुरुवातीपासून प्रतिभा धानोरकर व सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू होती.
कोणत्या ग्रहातून आलेय "हे"?; सायबर सेल ची यांचेवर कडक नजर?
👆👆👆👆👆👆
अशी बातमी आधार न्युज ने यापुर्वीच प्रकाशित केली होती!
19 एप्रिल रोजी निवडणूक सुरू झाल्यानंतर अवघ्या काही अवधीतच समाज माध्यमांवर न्यूज चॅनेलचे नावाने "ऑपिनियन पोल" दाखविण्यात आले. व त्या ओपिनियन पोल मध्ये काँग्रेसच्या उमेदवार या मोठी लीड घेऊन निवडून येतील असा "झोल" दाखवून हवा तयार करण्यात आली. आदर्श आचारसंहिता भंग करण्याचे काम प्रतिष्ठीत न्युज चॅनेलचे नावाने करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे 19 एप्रिल ला 7 वाजता निवडणूक सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासाच्या आत कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील? असा अंदाज या "ओपिनियन पोल" मध्ये दर्शविण्यात आला. हा अंदाज कशाच्या आधारावर होता हे कळयला मार्ग नाही, परंतु एबीपी माझ्यासारख्या वृत्तवाहिनीचा हा अंदाज असल्याची भासविण्यात आले. त्याची दखल घेऊन "एबीपी माझा" या वृत्तवाहिनी नुकतेच त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सटोडीयांचा "गेम" तर नाही नां?

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक पार पडल्यानंतर लगेच "ओपिनियन पोल" यायला लागले. चंद्रपुरात भाजप, काँग्रेसचे दर निश्चित करून या ठिकाणाहून अमाप पैसा कमविण्याच्या मार्ग शोधला असून विविध पोर्टलवर आलेल्या बातम्यानुसार काँग्रेस १.१० तर भाजप ९० असा दर सटूड यांनी निश्चित केला आहे. अनेकांनी हवेच्या आधारावर यामध्ये मोठी गुंतवणूक केल्याची सांगण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करून सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एबीपी माझा (ABP Maza) या वृत्त वाहिनीने या "ओपिनियन पोल" शी आपला काही संबंध नसून त्यावर कायदेशीर कारवाई ची मागणी केल्यानंतर सटोडीयांकडे रक्कमेची मोठी गुंतवणूक करणाऱ्यांच्या छातीत धडकी भरली असून चंद्रपूर जिल्ह्यातील या "ओपिनियनचा झोल" ची चौकशी व करोडो रूपयांचा जुगाराची व त्यात समावेश असलेल्या सटोडीयांची चौकशी व्हावी, ही मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या