भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे नवयुवक व नवयुवयतींसाठी दिनांक 20 मे ते 29 मे 2024 या कालावधीत SSB कोर्स आयोजित करण्यात येत आहे.

सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीं निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 9 मे 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Wel‍fare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट WWW.Mahasainik.Maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन (other- PCTC Nashik –SSB-५७ ) कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची उपलब्ध करुन दिले जाईल किंवा व्हॉटस्ॲप 9156073306 या मोबईल नंबर वर SSB-५७ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट Whatsapp द्वारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस.एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एन .सी.सी.ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. UNIVERSITY Entry Scheme साठी एस.एस.बी. कॅाल लेटर असावे किंवा एस.एस. बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253 -2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.