चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून विषबाधा, एकाचा मृत्यू #chandrapur#warora

वरोरा:- वरोरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी येथे महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास 80 लोकांना विषबाधा झाली असून, यापैकी एक जण मृत्यू पावला आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, देवीचे नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीनिमित्त माजरी येथील कालीमाता मंदिर येथे काल 13 एप्रिल रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी माजरी येथील नागरिक सहभागी झाले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्या होऊ लागल्या. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. विषबाधा झालेले भक्त रात्री दीडच्या सुमारास वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. या सर्वांवर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 69 विषबाधाग्रस्तांपैकी सहा जणांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यापैकी गुरुफेन यादव हा 80 वर्षीय रुग्ण मृत पावल्याचे कळते. यास इतरही आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

चंद्रपूर येथे हालविण्यात आलेल्या रुग्णात आर्यन राजपुता 5 वर्ष, अभिषेक वर्मा 5 वर्ष, आशय राम उवर्ष, सोमय्या कुमार दीड वर्ष, देवांश राम अडीच वर्ष व गुरु फेन यादव 80 वर्ष या जणांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्यांपैकी माजरी येथे प्राथमिक उपचार केंद्र येथे 10 जण, वेकोलीच्या रुग्णालयात 25 ते 30 जण दाखल असून काहीजण चंद्रपूर व वणी येथे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या