कोरपना:- राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील 'अंबुजा' फाट्याजवळ एका ठिकाणी लपवून ठेवलेला असल्याची गोपनीय माहिती 23 मे रोजी रात्रीच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांना मिळाली असता गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथील वाहतुक शाखेच्या पोलिसांनी लगेच सदर ठिकाणी जावून शोध घेत माजा तबाखू असलेल्या चुंमड्या जप्त केल्या.कारवाई दरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या एका आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे.
रामकिशोर महेश प्रजापती वयवर्ष अंदाजे 32 रा.उप्परवाही,असे आरोपीचे नाव असून 1 लाख,30 हजार रुपये किमतीच्या माजा तंबाखूसह त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांनी ठाणेदार शिवाजी कदम यांना कारवाईबाबतची माहिती दिल्यावर ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहफौ. धर्मेंद्र रामटेके, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत येंडे, रामसिंग पवार, युनुस शेख, महिला पोलीस कर्मचारी सरिता येरवडे यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.