पोंभूर्णा तालुका बनला चोर बिटी विक्रीचा अड्डा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे जप्त


पोंभूर्णा:- तालुक्यातील जुनगाव येथील घरात अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे विक्री साठी घरी बाळगले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून जप्त केले. यात १७ किलोग्रॅम चोर बिटी ज्याचे मुल्य बत्तीस हजार सहाशे चाळीस रुपये किंमतीचे बियाणे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई तालुक्यातील तिसरी कारवाई असून पोंभूर्णा तालुका आता चोर बिटी विक्री करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे.


अनाधिकृत चोर बिटी कापुस बियाण्यास शासनाची परवानगी नसतांना पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथे छुप्या मार्गाने चोर बिटी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळताच दि. २३ मे गुरूवारला जुनगाव येथील एका घरात १७ किलोग्रॅम चोर बिटी कापूस बियाणे ज्याचे मुल्य बत्तीस हजार सहाशे चाळीस रुपये भरारी पथकाच्या माध्यमातून पकडण्यात आले. व संबंधीत विक्री करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. गणेश शेषराव आखरे रा. जुनगाव व जनार्दन नागाजी घोडे रा. देवाडा बु. यांचेवर अनाधिकृत बियाणे बाळगणे, विक्री करणे बाबत पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर कार्यवाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.,जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार,कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती पोंभूर्णा कृषी अधिकारी नितीन धवस,मंडळ कृषी अधिकारी संतोष कोसरे,कृषी पर्यवेक्षक नेताजी वाकुडकर,पोलीस हवालदार सुनील कुळमेथे यांनी कारवाही केली.