सुधीर भाऊंचा कॉल अन् कार्यकर्ते पोहचले "त्या" गावात #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील देवाडा बुज येथे पाणी टंचाई निर्माण झाली. याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांना झाल्या नंतर लगेच आपल्या कार्यकर्त्यांना संपर्क साधून गावात जाण्यासाठी सूचना दिल्या.

देवाडा बुज येथे पाणी टंचाई आहे याप्रकारे कॉल प्राप्त झाले. कडक उन्हाळा लोकांना पाण्याची आवश्यकता ओळखून लगेच कार्यकर्त्यांना गावात पाठवून समस्यांचे निराकरण करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी अल्का आत्राम यांनी गावात जाऊन नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेत तात्काळ प. स. संवर्ग अधिकारी पोंभुर्णा यांचेशी संपर्क करून समाधान करण्यात आले. यावेळी सोबत नैलेश चिंचोलकर, अशोक मांडवगडे अतुल गोहने, आणि गावातील नागरिक उपस्थित होते.