सिंदेवाही:- कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही जि. चंद्रपूर मार्फत रेशीम शेतीचे जिल्ह्यामधे क्षेत्र वाढविण्याकरिता रेशीम मिशन राबविण्यात येत असून सदर मिशनची सुरुवात ही कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी गावातील शेतकऱ्यांपासून करण्यात येत आहे.या अंतर्गत 2 दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी केले होते. सदर दौरा हा रेशीम शेतीकरिता प्रसिद्ध अश्या बीड जिल्ह्यातील राहेरी आणि रूई या गावी आयोजित करण्यात आले होते.
कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विजय एन सिडाम, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार शिक्षण यांच्यासमवेत श्री. पराग सहारे आणि श्री. कैलास कामडी यांनी शेतकऱ्यांना घेऊन हा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके रेशीम शेतीबाबत माहिती आणि प्रेरणा मिळाली.यावेळी राहेरी गावातील सरपंच श्री. गोपीनाथ फलके आणि रूई गावाचे सरपंच श्री. कालिदास नवले यांनी मोलाचे सहकार्य केले.