Accident Breaking: भीषण अपघात; पिकअप वाहन उलटून १७ ठार #chandrapur #chhatisgarh #accident

Bhairav Diwase
छत्तीसगड:- छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप वाहन उलटून १७ जण ठार झाले आहेत. तर २५ हून अधिक जण जखमी जाले आहेत. या भीषण अपघातीत (Chhattisgarh accident) सर्वजण आदिवासी असून, मृतांमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

बैगा आदिवासी समाजातील 25-30 लोकांचा एक गट तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून परतत होता. दरम्यान बहपनी परिसरात त्यांचे वाहन 20 फूट खोल खड्ड्यात पडून हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व (Chhattisgarh accident) कुई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्तीसगडमधील कावर्धा परिसरात पिकअप वाहन पलटल्याने हा भीषण अपघात झाला. या (Chhattisgarh accident) अपघातात १७ जण जागीच ठार झाले, तर आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.