आम आदमी पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्रा तर्फे आप कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा.
राजुरा: १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस असून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. म्हणून जय भवानी कामगार संघटना व आम आदमी पार्टी, राजुरा विधानसभा क्षेत्रातर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आप पार्टी चंद्रपूर चे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात राजुरा येथील पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालय मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माल्य अर्पण करून व महाराष्ट्राच्या मातृभूमीची मराठी भाषेची अस्मिता सदैव गौरवशाली, अभिमानी असो 'जय महाराष्ट्र' च्या घोषणा देत आज राजुरा येथील आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळेस आम आदमी पार्टी चे युवा आघाडी अध्यक्ष रोशन बंडेवार, कामगार संघटनेचे राजुरा तालुका अध्यक्ष अनिकेत मेश्राम, तालुका सहसघटन मंत्री महेश ठाकरे यांच्यासह सहकारी मयुर गेडाम, सोनु भोयर, रोहीत पुल्लैवार, आर्दश नगराळे, जिवक नगराळे, अमेय कडूकर आधी सहकारी उपस्थित होते.