बल्हारपुर तालुक्यातील मौजा कोर्टिमक्ता येथील गुराखी वामन गणपती टेकाम (५९) हा साडेआठ वाजताचे सुमारास नियतक्षेत्र कळमणा मधील वनात बकरी चारण्यासाठी गेला होता.
गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना सदर इसम वनात बकरी चारत असल्याचे दिसताच त्यांला वनाच्या बाहेर काढण्यात आले. परत वनकर्मचारी हे गस्तीवर समोर निघुन गेले. परंतु सदर गुराखी हा पुन्हा बकऱ्या चारण्यासाठी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा नियतक्षेत्रामधील राखीव वनखंड क्रमांक ५१४ ए मध्ये गेला असता दुपारी १२ वाजताचे सुमारास त्याचेवर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना घडली.