
भद्रावती:- स्थानिक साईप्रकश बहुउद्देशिय कला व शिक्षण संस्था भद्रावती द्वारा ' बालकुमार फन अँड लर्न ' या उन्हाळी सुट्टी विशेष उपक्रमांतर्गत दि. 19 मे रोज रविवारला हुतात्मा स्मारक येथे ३ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांकरीता बाल दंत तथा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराकरीता चिकित्सक म्हणून डॉ. विनीत भरणे आयुर्वेदतज्ञ ,भद्रावती ,डॉ.यशवंत पोइनकर दंत चिकित्सक , भद्रावती, डॉ.सारंग लोणारे दंत चिकित्सक चंद्रपूर, व सहाय्यक म्हणून सरिता उच्चसरे व आकाश वाघमारे ही चमू उपस्थित होती. बालकांना सकाळी उठल्यापासून आरोग्याची काळजी कशी घ्यावी व कोणता सकस आहार घ्यावा आजार होऊच नये या करीता स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर बालकांना सविस्तर मार्गदर्शन डॉ. भरणे यांनी केले.तर केवळ गोड किव्हा चिकट पदार्थ खालल्यानंतरच दात किडतात हा गैरसमज डॉ . पोइनकर यांनी दूर केला . काही खाल्या नंतर दाताची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर माहिती दिली . मुलांसह पालकांशी सव्वाद साधुन मुलांच्या आरोग्याबाबत समुपदेशन व मार्गर्शन केले. १५० बालकांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिज शिवरकर तर आभार विवेक महाकाळकर यांनी केले .शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्या करीता विनोद ठमके सर, दानव सर, घोरपडे सर ,नितीन खेरकर , हर्षदा हिरदेवे तथा संपूर्ण शिबीर मार्गदर्शक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले .