लोकमान्य विद्यालयाच्या गुणवंतांचा सत्कार #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
भद्रावती:- नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात येथील लोकमान्य विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार केला.

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य तथा माजी प्राचार्य गोपाळराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, संजय पारधे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातून ९० टक्क्याच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या दिव्या धनराज मत्ते (९३.६०%), सोनल पंढरी खिरटकर (९२.४०%), उन्नती किशोर जट्टलवार (९२%) आणि मोनाली राहुल खांदारे(९०.२०%) या गुणवंतांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आणि पेढा भरवून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

🆗
यावेळी पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. यंदा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.७९% लागला असून १७३ विद्यार्थ्यांपैकी १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात प्राविण्य श्रेणीत ३१, प्रथम श्रेणीत ६८, द्वितीय श्रेणीत ५० आणि उत्तीर्ण श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

🆗 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य रुपचंद धारणे यांनी केले. संचालन शिक्षक शरद राजुरकर यांनी केले. तर आभार शिक्षक विशाल गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व पालक उपस्थित होते.