विरूर गाडेगाव येथील पुलाचे काम तत्काळ पूर्ण करा; अन्यथा रास्ता रोको आंदोलन chandrapur #korpana

Bhairav Diwase
भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांचा इशारा

कोरपना:- तालुक्यातील सुरू असलेल्या नारंडा फाटा-अंतरगाव- विरूर गाडेगाव-कवठाळा-पवनी या रस्त्याचे बांधकाम एनयूटी हायब्रीड अंतर्गत सुरू असून विरूर गाडेगाव येथे सुद्धा पुलाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे,परंतु पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा सदर पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे त्यामुळे सदर पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण न केल्यास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार यांना दिलेला आहे.


विरुर गाडेगाव येथे पुलाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या बाजूला जाण्याचा मार्ग बनविला आहे परंतु पावसाळ्यात नाल्याला मोठा पूर येतो त्यामुळे सदर पुलाच्या बाजूचा मार्ग वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे भोयगाव मार्गे चंद्रपूरला जाणाऱ्या वाहतुकीस खंड पडू शकतो.

कोरपना तालुक्यातील परसोडा, पारडी, कोरपना, वनसडी, नारंडा या परिसरातील नागरिक सदर मार्गाचा चंद्रपूरला जाण्यासाठी वापर करीत असतात परंतु पावसाळ्याच्या पूर्वी सदर काम न झाल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच गाडेगाव येथील काही विद्यार्थी विरूर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी जातात सदर पूल हे गाडेगाव व विरूर या दोन्ही गावाच्या मधात आहे त्यामुळे या दोन्ही गावाचा संपर्क पावसात तुटू शकतो, तसेच सदर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुद्धा विरुद्ध सुरू आहे ती सुद्धा बंद पडू शकते या सर्व बाबी लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सदर पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी विरूर गाडेगावच्या सरपंच तेजस्वीनाताई झाडे,उपसरपंच मारोती गोखरे मनोहर झाडे,गणेश आसकर,कवडू हुलके,प्रकाश आत्राम,राजू सुरपाम,नामदेव मुके,संजय काशिपेठे,आकाश गोरे,सिद्धार्थ गावंडे,संजय आसकर,प्रशिल काशिपेठे, उपस्थित होते