अमरावतीच्या 2 युवकांचा चंद्रपूरात मृत्यू #death #chandrapur #bhadrawati #amaravati

Bhairav Diwase
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरीजवळ दोन युवकांचा मृतदेह आढळला. ही घटना मंगळवार (ता. २५) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकिस आली. मृतांची नावे संदीप महादेव बेलसरे (वय २५ रा. जामणी ता. चिखलदरा जि. अमरावती), विजय तुलसाराम मावसकर (वय २८ रा. जामणी ता. चिखलदरा जि. अमरावती) अशी आहेत. त्यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.


अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या जामणी येथील संदीप सहादेव बेलसरे आणि विजय तुलसाराम मावसकर हे दोघेही जिल्ह्यातील घुग्घुस येथील एका कंपनीत मजुरीसाठी आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते घुग्घुस येथेच राहत होते. सोमवारी संदीप आणि विजय यांनी कामाच्या ठिकाणी असलेल्या कंत्राटदाराकडून काही साहित्य विकत घेण्यासाठी पैसे मागितले. त्यानंतर दोघेही साहित्य विकत घेण्यासाठी बाजारात गेले.


मात्र, रात्री ते परतले नाही. मंगळवार (ता. २५) दोघांचेही मृतदेह मुरसा येथील रेल्वे पटरीच्या बाजूला शेतशिवारालगत आढळून आले. या घटनेची माहिती लोको पायलट यांनी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर याची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला देण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.