चंद्रपूर:- देशात सातव्या टप्प्यातील मतदार आज पार पडले. हे मतदान संध्याकाळी संपताच लगेचच एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या आकड्यावर 2024 च्या लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) नेमका कसा लागणार आहे. हे कळणार आहे.
चंद्रपूर लोकसभेचा tv9 मराठीचा Exit poll?
लोकसभा एक्झिट पोल मध्ये इंडिया आघाडी व भाजप मध्ये टक्कर बघायला मिळत आहे. मात्र चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या जागेवर समोर कोण आहे. असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अश्यात tv9 मराठी ने महाराष्ट्र राज्याच्या पोल जाहीर केला आहे. यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंगेस उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहे.
चंद्रपूर लोकसभेत कोण बाजी मारणार?
चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे 2019 मध्ये निवडून आले होते. त्यापूर्वी हा मतदार संघ भाजपाचे हंसराज अहिर यांच्याकडं होता. या निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत झाली. लढायला इच्छुक नसलेल्या मुनगंटीवार यांनी लढतीत रंगत आणली, मात्र त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळं ते पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले पाहायला मिळाले. या मतदारसंघात वडट्टीवार आणि धानोरकर यांच्यात जरी संघर्ष पाहायला मिळाला. तरी सुद्धा धानोरकर यांना मिळालेली सहानुभूती आणि कुणबी समाजाची मते त्यांना विजयापर्यंत घेऊन जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध कॉंगेस अशी टक्कर होती. या निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची आघाडी दर्शविली आहे.
महाराष्ट्र लोकसभेत कुणाची आघाडी?
महाविकास आघाडी ला 25 तर महायुती 22 व अपक्ष 1 जागा महाराष्ट्र राज्यात जिंकत आहे. यामध्ये भाजप 18, शिवसेना शिंदे 4, राष्ट्रवादी अजित पवार 0, कांग्रेस 5, शिवसेना ठाकरे गट 14, शरद पवार राष्ट्रवादी 6 जागेवर विजय मिळणार. हा सध्या अंदाज असून येत्या 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे.