चंद्रपूर जिल्ह्यातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये 41 लाखांनी गंडविले #chandrapur #yawatmal #fraud

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसा कमविण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. पुणे येथील कंपनीत अभियंता असलेल्या तरुणाला सुरुवातीला नफा मिळताच त्याला आणखी पैसे कमविण्याचा हव्यास चढला.

मात्र, विड्राॅल करतेवेळी प्रतिसाद न मिळाल्याने 41 लाख 25 हजाराने गंडविल्याचे यवतमाळात प्रवासादरम्यान लक्षात आले. याप्रकरणी शुक्रवारी यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार देण्यात आली.


रुपेश जयदास ठाकरे (३६), रा. हनुमाननगर, तुकूम, जि. चंद्रपूर, असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ताे पुणे येथील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. 18 एप्रिल राेजी 20 हजार रुपये गुंतवणूक केली. त्यात त्याला 5 हजार व 3 हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला. ती रक्कम विड्राॅल न करता अधिक लाभापाेटी विविध बॅंक खात्यातून 41 लाख 25 हजार रुपये गुंतवणूक केली. त्याचा एकूण लाभ एक काेटी २३ लाख रुपये एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर दाखविण्यात येत हाेता.

पुणे येथून चंद्रपूरकडे जात असताना यवतमाळ येथे पाेहचला. यावेळी पैसाचे काम असल्याने एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर 6 लाख 70 हजार रुपये विड्राॅल करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली. मात्र, पैसे विड्राॅल झाले नाही. कंपनीकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून काेणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे एक्युआर कंपनीद्वारे बनावट ऑनलाईन डिमॅट देऊन फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच रुपेश ठाकरे याने यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अंजली नामक महिलेविरुद्ध कलम ४२०, भादंवी सहकलम ६६(सी), ६६(डि), माहिती तंत्रज्ञान कायदा २०००प्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)