विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का! #Chandrapur

Bhairav Diwase
0
काँग्रेसने 'या' नेत्यांवर केली कारवाई
चंद्रपूर:- विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आसावरी देवतळे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय देवतळे यांना काँग्रेसने 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाने केलेली कारवाई विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.


स्थानिक पातळीवरून पक्ष कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.


डॉ. विजय देवतळे हे माजी मंत्री दादासाहेब देवतळे यांचे चिरंजीव असून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत. तर आसावरी देवतळे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि वरोरा विधानसभेसाठी 2014 ला होत्या काँग्रेस उमेदवार होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)