पोंभुर्ण्यात कॉंगेस तालुकाध्यक्ष V/S कॉंगेस कार्यकर्ते? #Chandrapur #pombhurna #congress

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुका ग्रामीण अध्यक्षपदाची निवड झाली असून ती पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारचे संवाद न साधता परस्पर व्यक्ती विशेष म्हणून वासूदेव पाल यांची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. याकरिता पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कुठलीही चर्चा न करता परस्पर एकाच व्यक्तीच्या नावाने शिफारस अध्यक्ष पदाची करून जिल्हा अध्यक्षाने पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदी वासूदेव पाल यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष यांचे आजपर्यंत काँग्रेस पक्षांसाठी कुठलेही योगदान नाही आणि त्यांची पार्श्वभूमी बघितली असता काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा आदेश जुगारून पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवली व काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षात (भाजपा) आपले स्थान मिळवले असा आरोप पत्रकार परिषदेत कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.



भाजपाचे आजपर्यंतचे कार्य काळात काम करीत होते त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वेळी पक्ष विरोधी काम केलेले आहे. अशा व्यक्तीची जर पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी निवड होत असेल तर पोंभुर्णा तालुक्यातील काँग्रेस विचारसरणीनुसार काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून कार्य करण्याच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे. करिता पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करून योग्य व सर्व समावेश काँग्रेस विचारसरणीचा तालुका अध्यक्ष देण्यात यावा अन्यथा संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण कार्यकर्ते व सर्व सेलचे पदाधिकारी तसेच ग्रामीण महिला सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार असा इशारा कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.


या पत्रकार परिषदेत विनोद थेरे, देवराव कडते, राकेश नैताम, प्रशांत झाडे, रोहिणी नैताम, वंदना उईके, वैशाली कुंमरे, तसेच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.