कोरपना पोलीस स्टेशनमध्ये युवकाला अमानुष मारहाण #korpana #chandrapur

Bhairav Diwase
0

कोरपना:- मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे. त्या संबंधाने बोलवून ठाणेदारानी पट्ट्या- पट्ट्या ने झोडपून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणीची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांना करण्यात आली आहे.


दिलेल्या तक्रारीत, शुक्रवार दिनांक ७ जून रोजी संध्याकाळी सात वाजता कोरपनाचे ठाणेदार, एक वाहतूक पोलीस कर्मचारी, एक महिला पोलीस कर्मचारी यांना घेऊन तांडा ( धानोली ) येथे आले. येथील रमेश सिंगटराव मूनावत यांचे घरी अवैध दारू साठा आहे. म्हणून घराची झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांची लहान मुलगी उपस्थित होती. त्या दरम्यान रमेश मुनावत यांचे पुतणे तक्रारदार विपुल देविदास मुणावत यांनी घरात कुणीही नाही म्हणून सांगितले. तेव्हा ठाणेदारानी शासकीय कामात अडथळा आणू नको बजावले. त्यांच्या काकाचे घर तपासल्यानंतर त्यांचे घर कुठे आहे म्हणून विचारले असता त्यांनी ते सुद्धा दाखवले. तपासात घरात काहीच मिळून आले नाही. तेव्हा ठाणेदार यांनी मागील गुन्ह्याचा तपास आहे. म्हणून दिनांक ८ जूनला बोलावले. ठाण्याच्या आवारात पोहचताच विपुल मुनावत यांनी मोबाईल मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. ठाणेदारानी केबिनमध्ये बोलवले. त्याचबरोबर एका शिपायाला पट्टा घेऊन बोलवून याला पन्नास पट्टे मार म्हणत, त्या अगोदर शिवीगाळ केली. अर्धा तास पट्ट्यांनी सूज येई पर्यंत चोप दिल्यानंतर ठाणेदारांनी बहिण व आई विषयी अश्लील शिवीगाळ केली. दवाखान्यात गेल्यास पुन्हा चोप देतो अशी धमकी देऊन गावाला परत पाठविले. गावकऱ्यांनी त्यानंतर दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून घेत डॉक्टर करवी उपचार केले . या अनुषंगाने झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ठाणेदार व पोलीस शिपायास कारवाई करून तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी अन्यायग्रस्त व तक्रारदार विपुल मुनावत यांनी केली आहे.आरोपीवर काही महिन्या अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संबंधित माहिती विचारण्याकरिता त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले मात्र आरोपीने जो आरोप केला त्यात कसलेही तथ्य नाही असे मत व्यक्त केले.
कोरपणा ठाणेदार संदीप एकाडे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)