Police Recruitment : पावसाने फिरवले मैदानी चाचण्यांवर 'पाणी'; पोलिस भरती प्रक्रिया

Bhairav Diwase
0
नाशिक:- आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया आता पावसाच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. शहर पोलिस मुख्यालयाकडून भरतीसंदर्भातील मैदानी चाचणीचे नियोजन करण्यात आलेले होते.

दरम्यान, नवीन वेळापत्रकान्वये चाचणी संदर्भातील माहिती उमेदवारांना कळविण्यता येणार आहे. मात्र भरतीसाठी आतुर असलेल्या उमेदवारांचा यामुळे पुन्हा हिरमोड झाला आहे. 

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त पोलिस शिपाई पदाच्या ११८ जागांसाठी सोमवारपासून (ता. १०) प्रत्यक्ष मैदानी चाचणी होणार होती. यासाठी शहर मुख्यालयाकडून मैदानी चाचणी व बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. पोलिस आयुक्तालयात आठ वर्षांनंतर रिक्त झालेल्या शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

भरतीसाठी ८,३२५ अर्ज प्राप्त

यामुळे भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तर, भरतीसाठी ८,३२५ अर्ज प्राप्त झाले असून, यात ६ हजार ७५ पुरुष आणि २ हजार २४८ महिलांसह दोन तृतीयपंथी उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची पथके पोलिस भरतीच्या प्रक्रियेची तयारी करीत आहेत. 
पुन्हा उमेदवारांचा हिरमोड

मैदानी चाचणीसाठी उमेदवारांकडून कसून तयारी सुरू आहे. आधीच मैदानी चाचणीला विलंब झालेला असल्याने तयारी करणार्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मात्र, पावसाळी वातावरणामुळे मैदानी चाचणी घेण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे सुधारित तारिख जाहीर करण्याचा विचार आयुक्तालयामार्फत सुरू आहे. यामुळे पुन्हा उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

लवकरच प्रक्रिया

पोलिस भरतीच्या उमेदवारांना हॉल तिकिट देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, शरणपूर रोडवरील शहर पोलिस कवायत मैदानावरच या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व तयारी व कामकाजासाठी पोलिस दलातील ७६ खेळाडू अंमलदारांना मुख्यालयात संलग्नही करण्यात आलेले आहे. मैदानी चाचणीची तारीख निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे मैदानी चाचणीसाठीचा दिवस व वेळ कळविला जाणार आहे.

''सध्या पावसाची शक्यता वर्तविल्याने मैदानी चाचणीला काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेले आहे. लवकरच सुधारित तारीख उमेदवारांना कळविली जाणार आहे. तर, पोलिस प्रशासनाकडून मैदानी चाचणीसाठीचे नियोजन र्पू करण्यात आलेले आहे.''
चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर मुख्यालय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)