मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पोलीस भरती प्रक्रिया तारीख जाहिरात करण्यात आली मात्र या मध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.
पोलिस भरती करणारे विद्यार्थी अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेमध्ये सराव करीत आहे. या करिता कुठे तरी आपल्या नोकरी करिता आपल्याला संधी मिळणार या करिता दिवस-रात्र मेहनत करून सराव व अभ्यास करत असतो. मात्र काल प्रशासन माध्यमातून पोलीस भरती तारीख जाहिरात करण्यात आली. या करिता विद्यार्थ्यांना तीन महिन्यापासून फॉर्म भरण्यात आले होते. या मध्ये निवडणूक आल्याने तारीख पुढे नेण्यात आले होते मात्र या सर्व तारीख वेळेवर काढून या मध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलीस व SRPF भरती ग्राऊंड तारीख लागोपाठ आल्याने पूर्ण महाराष्ट्र भर विद्यार्थी नुकसानीच्या भरपाई मध्ये सापडलेला आहे. या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी अमरावती, पुणे, सातारा, चंद्रपूर, सांगली, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, मुंबई, असे अनेक ठिकाणी फॉर्म विद्यार्थी यांनी भरले. मात्र त्यांना सर्व तारीख ही एका मागे एक आल्याने ४०० ते ५०० किलोमीटर प्रवास कसा करावा असा मोठा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पडलं आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या police आणि SRPF भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय.. तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात.
आमदार रोहित पवार