चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काही महिलांना उद्योगासाठी 50 हजार रुपये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून मिळणार आहे अशी बतावणी करुन महिलांकडून प्रति एक हजार रुपये घेत असल्याच्या अनेक तक्रारी खासदार प्रतिभा धानोरकर यांना प्राप्त झाल्या. अशी कुठलीही शासनाची योजना नसून कृपया आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही एजंटला पैसे देऊ नये असे कोणी पैसे मागितल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क करावे असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकरांनी महिलांना केले आहे.
Also Read:- .....तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही
खासदार प्रतिभा धानोरकरांचे जाहिर आवाहन
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व महिला भगिनींना सस्नेह नमस्कार. लोकसभा क्षेत्रातील काही महिलांना उद्योगासाठी 50 हजार रुपये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून मिळणार आहे अशी बतावणी करुन महिलांकडून प्रति एक हजार रुपये घेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याआहेत.
मी महिला भगिनींना आवाहन करते की, अशी कुठलीही शासनाची योजना नसून कृपया आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही एजंटला पैसे देऊ नये असे कोणी पैसे मागितल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क करावा व फसवणूक टाळावी..
प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर
खासदार, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र