चंद्रपूर:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहाला संबोधित करताना आपले परखड मत त्यांनी व्यक्त केले.
Also Read:- Sudhir Mungantiwar: शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही याची काळजी घ्या!
“कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण आरक्षण देताना ओबीसीतून कोणालाही आरक्षण देऊ नका. आरक्षण द्यायच असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी बांधव स्वस्त बसणार नाही. गरज पडली तर मी सुद्धा खांद्याला खांदा लावूण रस्त्यावर उतरेन”, असे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार सुधाकर अडबाले, महासचिव सचिन राजूरकर यांच्यासह ओबीसी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक संघटना आणि इतर सामाजिक संघटना, चंद्रपूरच्या वतीने खासदार धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.