बल्लारपूर:- बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले ( वय 40 ) हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. मागील पाच-सहा दिवसांपासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवार त्याचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे रा. चंद्रपूर हे अजय ला मिळण्याकरिता आले असता त्यांना आतून दरवाजा बंद दिसला.
तसेच आतून दुर्गंध येत होता. त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वार्टर चा लोकांना सांगितले. पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. अजय यांनी आत्महत्या दोन दिवसापूर्वी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केले. पोलीसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, पोलीस निरीक्षक आसिफराजा बी.शेख यांनी भेट दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, पो.शी खंडेराव माने करत आहे. मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे.