राजुरा:- दिनांक 13 जुलै 2024 रोजी मा.कवडुजी सातपुते माजी सरपंच यांच्या प्रयत्नांनी, ग्रामपंचायत, खामोनाचे सहकार्य व शाळा व्यवस्थापन समिती,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , खामोना, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या अथक परिश्रमाने समाज भवन परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सर्व कार्यात आर्यन कोल वाशरीज चे सहकार्य लाभले. आर्यन कोल वाशरीज , पांढरपौनी यांचेकडून साऊंड बाँक्स विथ माईक सिस्टिम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना संधी मिळावी यासाठी भेट रूपात सन्माननीय वर्मा साहेब व मान. सिंग साहेब यांनी शाळेला दिली.
सन्माननीय वर्मा साहेब व मान. सिंग साहेब, ग्रामपंचायत सरपंच मा. हरीभाऊ झाडे , मा.कवडुजी सातपुते माजी सरपंच,शा.व्य. स. अध्यक्ष मा. किशोर भाऊ पोटे तथा इतर सदस्य, ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रौढ पुरुष व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज भवन परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण ( पाम,अशोका व इतर झाडांची लागवड ) कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय लांडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकेत वृक्ष लागवडीचे फायदे याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. सन्माननीय वर्मा साहेब व मान. सिंग साहेब,ग्रामपंचायत सरपंच मा. हरीभाऊ झाडे यांनी ही वृक्षारोपनाचे महत्त्व सांगूने वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन केले तसेच वृक्षांना विद्यार्थ्यांनी स्वतः चे नाव देऊन जतन करण्यास सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तामगाडगे मँडम , भोयर सर आणि अजाणी सरांनी मेहनत घेतली. सर्वांनी खूप आनंदाने व मौजेने हा दिवस स्मरणीय बनवण्यासाठी कृती व कार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.