चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून इरई धरण तुडुंब भरल्याने 3 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली.
सततच्या पावसामुळे धरणात जलस्तर वाढला आहे. त्याचा परिणाम इरई धरणाचे सात पैकी 1, 4 व 7 क्रमांकाचे तीन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.