8007101459
ब्रम्हपुरी:- येथून 5 किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथील तलाव फुटला असून धानोलिपोहा या गावात पाणी शिरले आहे.शेतातील पीक या पाण्याने प्रभावित झाले आहे. सकाळी 8 पासून पाणी शेतात येन सुरू झालं आणि बघता बघता धानोलिपोहा गावात शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
8007101459
मालडोंगरी आणि धानोलिपोहा हे दोन गाव मिळून गटग्रामपंचायत आहे.धानोलिपोहा हे गाव खाल भागात असल्याने तलावाचा संपूर्ण लोंढा या गावाकडे वळला असून 400 एकरहून धानपिक पूर्णतः प्रभावित झाले आहे. शेत शिवारा सोबतच गाव जलमय होण्याच्या मार्गावर आहे.वृत्त लिहिस्तोवर जवळपास 25 घरे व कुटुंब पाण्याच्या तावडीत सापडले आहेत.
या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालावा व गावकऱ्यांना सुरक्षितता प्रदान करावी,अशी मागणी गावकऱ्यांची आहे.
8007101459
रस्ते देखील बंद झाले असून गावाच्या सभोवताल पाणी पसरला आहे. गाव आणि शेतशिवार या पाण्याच्या विळख्यात आले आहे. मालडोंगरी येथील तलावाची पाळ फुटल्याने मालडोंगरी,रानबोथली ते मेंडकी मार्ग बंद झालेला आहे.