चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत असुन जिल्हयातील मुल जाणाऱ्या महामार्ग / रस्ते पाण्याखाली आल्याने जड वाहतुकीचे आवागमन बंद झालेले आहे. सध्या जिल्हयातील चंद्रपूर ते मुल मार्ग बंद, पोंभुर्णा ते मुल मार्ग बंद, गोंडपिपरी ते मुल मार्ग बंद चंद्रपूर ते गडचांदुर भोयेगांव मार्ग बंद झालेले आहेत.
तरी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरीकांना विनंती केली आहे की, पुरस्थिती मार्गावर पुर पाहण्यासाठी जावु नये. जिल्हयात मागील दोन दिवसांपासुन सततधार सुरु असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, हारपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असुन नदी नाल्यांना पुर आला आहे. नुकतेच नागभीड तालुक्यातील पूर पहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह दोन जण वाहुन गेले. त्यामुळे पूर पाहणाऱ्या हौशी नागरीकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी असे पुरस्थिती ठिकाणी जावुन स्वतःव इतरांचे जिव धोक्यात टाकु नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नागरीकांना केले आहे.
त्याच प्रमाणे सर्व ट्रॉन्सपोर्टस यांना आवाहन करण्यात येते की, जिल्हयातील मार्गाचे परिस्थीती जानुन वाहने रस्त्यावर पाठवावे अन्यथा रस्त्याचे कडेला वाहने लावुन प्रशासनास सहकार्य करावे. आपातकालीन परिस्थीतील चंद्रपूर पोलीस दलाचा हेल्पलाईन कमांक 112 तसेच चंद्रपूर आप्पती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172-272480, 251597 वर अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या मदती करीता संपर्क करावे.