चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; घरासह शेतात शिरले पाणी, अनेक मार्ग अद्यापही बंदच #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस होत आहे. अनेक नद्या-नाल्यांमधील पाणी बाहेर वाहताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतही झाले आहे. असे असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद पडले आहेत. यात चिमूर ते सिंदेवाही खुटाळा, चिमूर ते हिंगणघाट, चिमूर ते नांद गिरड, राजुरा ते सिंधी बामनवडा या मार्गावरील पुला खालील माती वाहून गेल्यामुळे मार्ग बंद करण्यात आले आहे. चिमूर ते तडोधी सोनापूर, चिमूर-सिंदेवाही, पहार्ण-पिपार्ड, वरोरा तालुक्यातील वरोरा मोखाळा, अल्फर मार्ग, शेगाव-आष्टा-मुधोली, शेगाव-चारगाव, खुटवंडा-शेगाव, चंदनखेडा- खुटवंडा, मार्गही अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आले आहे.

सुबईसमोर नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे सूबई ते चिंचोली मार्ग वाहतुकीस बंद आहे. चिमूर-नागपूर, चिमूर ते ब्रह्मपुरी-बामनी मार्ग बंद करण्यात आला आहे. वरोरा खरवड, दहेगाव, नाला, आमडी, वनली समोरचा नाला अतिवृष्टीमुळे बंद आहे. वरुर ते विरुर स्टेशन मार्ग तेंबुरवाही समोर नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीस बंद आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली.