बल्लारपूर शहरात शिवसेना महिला आघडीतर्फे शिवसंपर्क अभियान आढावा बैठक #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
बल्लारपूर:- बल्लारपूर येथील बंजारा मंदिर जवळील फुलसिंग नाईक वार्डात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचा शिवसंपर्क आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे मार्गदर्शनात व उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव यांच्या नेतृत्वाखाली, सौ. मनस्वी संदिप गिऱ्हे, महिला जिल्हा संघटीका सौ. कल्पना गारगोटे, सौ.मीनाक्षी गलगट,यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी फुलसिंग वार्डातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी महिला आघाडीच्या वतीने बल्लारपूर शहरातील संपूर्ण वार्डात शिवसंपर्क अभियाना अंतर्गत महिलांचे प्रश्न समस्या,पक्ष संघटने विषय मार्गदर्शन, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्काचा माणूस म्हणून संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या सोबत राहून त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे,व महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार राहील तरी त्याला निवडून आणूया हा आपण यावेळी संकल्प करून व माजी मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब, यांचा हात मजबूत करूया, मुल येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात आपण बेरोजगार युवक युवतींना सांगून रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ या असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

यावेळी सौ.ज्योती गाहलोत,तालुकाप्रमुख मीनाक्षी गलगट, माजी नगरसेविका सौ.रजनी बीरे,शहर समन्वय सौ.अंजली शिव बंसी,सौ.रिता बिन बन्सी व आदी बैठकीला मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.