Chandrapur Bus: चंद्रपूर जिल्ह्यात बस पुरात अडकली! #Chandrapur #pombhurna #bus

Bhairav Diwase

🌅

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अनेक भागात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. या पुरात एसटी बस अडकल्याची घटना जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात घडली. पाण्याची पातळी वाढत असताना चालक, वाहक आणि प्रवाशांनी लगेचच पुराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं मोठी दुर्घटना टळली.


🌅

गोंडपिंपरी- मुल मार्गाची एसटी बस पोंभूर्णा येथून मुलकडे निघाली होती. सुशी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते. चालकाने गाडी थांबवली आणि पुराच्या पाण्याचा अंदाज घेतला. मात्र काही वेळातच पूर वाढला. पाण्याची पातळी वाढली. चालकाने सतर्कता बाळगत दोन नाल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडाच्या भागावर बस नेली. चालक, वाहक, प्रवासी तिथून सुखरूप बाहेर पडले.