चंद्रपूर:- नशीब बलवत्तर असेल तर येणारे संकटही पळून जाते अशी घटना शिरपूर - बोथली नाल्यावरील थरार दरम्यान घडली आहे. काल शनिवारी रात्री दोन कर्मचाऱ्यांचा पुरात वाहून गेल्याचा थरारक माहिती समोर आला आहे. वाहून जाताना झाडाला पकडल्याने तब्बल तीन तास पुरात जीव मुठीत धरून राहिले. पोलिस प्रशासन आणि स्थानिक धावून आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पिंटू भरडे ( रा. चिमूर) व केशव श्रीरामे (रा. नेरी) असे त्यांचे नावे आहेत. दोघेजण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आहेत.
मागील तीन दिवसापासून संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी नाले, तलाव भरले आहेत. ठिकठिकाणी मार्ग बंद झाले आहेत. चिमूर तालुक्यातील नेरी लगतच्या बोथली (शिरपूर) नाल्यालाही पूर वाढल्याने मार्ग बंद झाला होता. याच मार्गाने जाणारे काही नागरिक शिरपूर नाल्यावर पुरामुळे अडकले होते. हे दोघेही कर्मचारी शिरपूर नाक्याजवळ दुचाकीने पोहचले.
काही नागरिक पुरामुळे त्याच ठिकाणी थांबून असताना हे दोघे कर्मचारी पुरातील पाण्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत होते. काहींनी त्यांना पुरातून बाहेर या? असा सल्ला ही दिला. त्यानंतरही ते दोघे दुचाकीने नाल्यावरील पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी दुचाकीने पाण्यात शिरले. मात्र, पाण्यात अर्ध्यात गेल्यावर दुचाकी बंद पडली. आणि त्याचवेळेस पाण्याचा लोंढा आला. दोघांचाही बलेंस बिघडला आणि नाल्यातील पुरात वाहून गेले. एक दीडशे तर दुसरा तीनशे मीटरवर वाहत गेला. त्यांनी समयसूचकता दाखवित झाडाला पकडून ठेवले.
स्थानिकांनी सदर घटनेचे माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी चिमूर पोलिसांना माहिती दिली. तहसीलदार यांनाही माहिती देण्यात आली. गावात माहिती होताच नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. चिमुरचे ठाणेदार संतोष बाकल हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळापासून जवळच अडकलेले दोन्हीं कर्मचारी जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. चंद्रपूर व ब्रम्हपुरी येथील रेस्क्यू टीमला प्रशासनाने पाचारण केले होते. मात्र, त्यांना येण्यास उशिरा होता. त्यामुळे पोलीसांनी तातडीने अडेगाव येथील बाळू झोडे, सिरपूर येथील सुभाष डहारे यांना पाचारण केले. दोघेही टूबच्या सहाय्याने दोरखंडासोबत घेवून त्यांना काढण्यासाठी पुरातील पाण्यात गेले. एक दिडसे तर दुसरा तीनशे मीटर अंतरावर अडकलेला होता. दोघेही जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते.
एकापाठोपाठ दोघांनाही टूबच्या सहाय्याने पुरातून बाहेर काढण्यात आले. पोलीसांनी त्यांना आपल्या वाहनातून बाहेर घेतले. त्यानंतर त्यांच्या गावी पाठविण्यात आले. चिमूरचे आमदार भांगडिया यांना माहिती झाली. त्यांनीही आवश्यक ती मदत पुरविली. तहसीलदार यांनी आपला मनुष्यबळ पाठवून मदत केली. विशेष म्हणजे, त्या दोन युवकांनी आपले जीव धोक्यात टाकून दोन्ही कर्मचाऱ्याचे जीव वाचवविल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. नशीब बलवत्तर म्हणून दोन देवदूत वेळेवर मदतीला धावल्याने दोघांचेही जीव वाचले. पुरातून बाहेर कढण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला.