युवक व महिलांचा शिवसेनेत प्रवेश #chandrapur #mul

Bhairav Diwase


मुल:- मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी गावातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. यावेळी पोंभुरना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिषभाऊ कावटवार, मुल शिवसेना तालुका प्रमुख प्रशांतभाऊ गट्टूवार, उपतालुका प्रमुख, चेतन मूगमोडे व आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेनंतर आता सर्वांनाच विधानसभेचे वेध लागले आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणारे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे. विधानसभेसाठी शिवसेनेतर्फे प्रबळ दावेदार असलेले शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनीही बल्लारपूर विधानसभेच्या राजकीय आखाड्यात कंबर कसत मतदार संघ पिंजून काढत आहे. याच परिश्रमाची फलनिष्पत्ती म्हणून रोजच्या रोज संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरी तथा ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काल दि.१६ जुलै रोजी, मुल तालुक्यातील डोंगरगाव येथे आढावा बैठकीच्या झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सकारात्मक आणि विकासात्मक कार्य आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या कार्यवर विश्वास ठेवून व प्रशांत गट्टूवार,चेतन मूगमोडे यांच्या नेतृत्वाखाली युवक व महिलांनी पक्षप्रवेश केला.

यात शुभम पोहनकर, रुपेश चिरके, जगदीश खोब्रागडे, सागर बोपेवार, सुरज मेश्राम, अतुल चिरके,मोहन भंडारे, नयन पिपरे,अनिल वासेकर,स्वप्निल शेंडे,अक्षय पेटकुले,विनोद ठाकरे, संस्कार पेंटावार ,जुगल पिपरे, निलदेव ठाकरे ,सागर धोडरे, प्रदीप धुंडे,विनायक हजारे ,राहुल चिरके,लोकेश पेंदाम,विकास भांडेकर, सौ.उर्मिलाताई वासेकर,सौ.विश्रांती संतोषवार खोब्रागडेताई, सौ.प्रभाताई पेंदाम, सौ.संगीता झोडे, सौ.जोशना मुंगमोडे व आदी अनेक युवक व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.