तात्काळ नुकसान भरपाई द्या; बेंबाळ वासियांची मागणी #chandrapur #mul

Bhairav Diwase
मुल:- तालुक्यातील बेंबाळ येथे सतत होणाऱ्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, शेतमालाचे तसेच शेती अवजारांचे पुरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी बेंबाळ ग्रामवासीयांनी केली आहे.

यापूर्वीच या भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे 'ओला दुष्काळ जाहीर करा' अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा ताई गावतुरे यांनी धरून लावली आहे. शेतीच्या नुकसाना बाबत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन माहिती दिली याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच चांगदेव जी केमेकर, उपसरपंच देवा ध्यानबोईवार, बेंबाळ चे तलाठी नगराडे साहेब ,कोतवाल मंगल मडावी ,ग्रामपंचायत कर्मचारी तुषार वनकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य विनोद वाढई तसेच सुनील जी पेटकुले ,राकेश जी कुंभारे, डॉ.चौधरी ,विशाल कत्रजवार ,विवेक जी गोहने वासुदेव तीमाडे ,देवराव शिंदे तिरुपती शिंदे ,विवेक चणकापूर, विनोद भडके ,बलवान पुठावर, अशोक अकेवार, सुभाष सोनुले, सुहास आक नूरवार ,विद्याधर वाढई ,धनंजय आकनूर वार व अन्य शेतकरी उपस्थित होते