SRPF भरतीत बोगस जातीतील उमेदवारांची निवड? #Chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
गडचिरोली:- राज्य राखीव पोलीस बल क्र. 17 कोर्टीमक्ता वतीने सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 ही भरती प्रक्रिया सुरु असून गडचिरोली जिल्ह्यात एन. टी. (सी). धनगर प्रवर्गाकरिता आरक्षित जागेवर झाडे कुणबी या बोगस उमेदवारांची तात्पुरती निवड यादीत नावे आल्याने यावर धनगर समाज संघटनानी आक्षेप घेत बोगस उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे.

Police Bharati WhatsApp Group Join 

राज्य राखीव पोलीस भरतीत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 5 जागा आरक्षित केल्या आहेत. या भरतीत झाडे कुणबी या बोगस जातीने धनगर एन.टी. (सी) चे बोगस झाडे जातीचे दाखले जोडून भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. नुकतीच 23.07.2024 रोजी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महेंद्र मुन्नाजी तुनकलवार, साहिल विजय तुनकलवार, सुमित लहू पुलकलवार, ऋषीं कालिदास येलमुले, अक्षय अरुण येजुलवार तर प्रतीक्षा यादीत लंकेश्वर सुनील दिवटीवार हे सर्व बोगस एन. टी. (सी) चे उमेदवार आहेत. यातील साहिल विजय तुनकलवार या उमेदवाराचे गडचिरोली जिल्हा जात पडताळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले आहे. वारंवार झाडे कुणबी घुसखोरी करीत असल्याने बोगस उमेदवारांची निवड रद्द करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्ष, धनगर समाज संघर्ष समिती, धनगर अधिकारी-कर्मचारी संघटना व धनगर समाजाच्या वतीने समादेशक राज्य राखीव भरती कोर्टीमक्ता यांचेकडे केली आहे.