चंद्रपूर जिल्ह्यात दोघेजण पुरात वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला #chandrapur #nagbhid

Bhairav Diwase
चंद्रपूर:- नागभीड तालुक्यात दोन व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की, या दोन घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.

पहिल्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

दुसरी घटना विलम येथे घडली. विलम येथील ॠणाल प्रमोद बावणे (११) हा मुलगा सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला.